Rashtravandana Dhol Tasha Pathak, Kalmeshwar
Kalmeshwar, Nagpur district, Maharashtra
- Pathak pramukh
- Shantanu Kale
- Established
- 2017
- Phone
- 7721824628
About the pathak
विश्वव्यापी श्री गुरुदेव सेवा मंडळ, कळमेश्वर यांच्या अंतर्गत सन 2017 मध्ये “राष्ट्रवंदना ढोल ताशा व ध्वज पथक, कळमेश्वर” ची स्थापना करण्यात आली. या पथकाचे संस्थापक डॉ. सचिन महाराज काळे आहेत. पथकाची स्थापना ही केवळ पारंपरिक वाद्यकलेचे सादरीकरण करण्यापुरती मर्यादित नसून, महाराष्ट्राची सांस्कृतिक व पारंपरिक वाद्यपरंपरा जपणे, तिचे संवर्धन करणे आणि ती नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा त्यामागील प्रमुख हेतू आहे. त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा, साहित्याचा आणि ग्रामोन्नती व राष्ट्रनिर्माणाच्या संदेशाचा प्रचार-प्रसार करणे, युवकांना समाजकार्यासाठी संघटित करणे आणि त्यांच्यात राष्ट्रप्रेम, शिस्त, सेवा व सामाजिक जबाबदारीची भावना निर्माण करणे हे पथकाच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. युवा संघटन, “जय जवान – जय किसान” या विचारांचा प्रसार, व्यसनमुक्ती जनजागृती, महिला सशक्तीकरण, सामाजिक ऐक्य, संस्कार आणि लोकजागृती या विविध क्षेत्रांत पथक सातत्याने कार्यरत आहे. पथक स्थापनेपासून राष्ट्रवंदना ढोल ताशा व ध्वज पथकाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक, राष्ट्रप्रेरणादायी व लोकपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. पारंपरिक ढोल-ताशाच्या नादातून केवळ उत्सव साजरा न करता, समाजाला सकारात्मक संदेश देणे आणि युवकांची ऊर्जा समाजहितासाठी प्रवाहित करणे, हीच पथकाची खरी ओळख बनली आहे. “परंपरेचे संवर्धन, संत-थोर महापुरुषांच्या व राष्ट्रसंतांच्या विचारांचा प्रसार आणि समाजसेवेचा ध्यास” या त्रिसूत्रीवर राष्ट्रवंदना परिवाराची पथक स्थापनेपासून वाटचाल अखंडपणे सुरू आहे.