DHOLTASHA.IN · Find a pathak · Articles · Add your pathak · Contact

DHOLTASHA.IN

🚩 जय शिवराय 🚩 ढोल-ताशा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमान आहे. गणेशोत्सवाची मिरवणूक असो, शिवजयंती असो किंवा गुढीपाडव्याची शोभायात्रा, ढोल-ताशाचा गजर सुरू झाला की सगळा परिसर उत्साहाने भारून जातो. ही परंपरा जिवंत ठेवणारे हजारो वादक आणि शेकडो पथके गावोगावी, शहरोशहरी वर्षभर सराव करत असतात. पण आजपर्यंत या सर्व पथकांची माहिती एका ठिकाणी उपलब्ध नव्हती. dholtasha.in हे त्याच उद्देशाने सुरू केलेले व्यासपीठ आहे: महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील ढोल-ताशा पथकांची विश्वासार्ह, एकत्रित आणि मोफत माहितीसूची. येथे तुम्हाला काय मिळेल? पथक शोधा: पथकाचे नाव, राज्य, जिल्हा किंवा शहर निवडून तुमच्या परिसरातील पथके सहज शोधा. संपूर्ण माहिती: प्रत्येक पथकाचे स्वतंत्र पान आहे. त्यावर पथकाची ओळख, पथक प्रमुखांचे नाव, स्थापना वर्ष, पत्ता, संपर्क क्रमांक, फोटो, व्हिडिओ, सोशल मीडिया लिंक आणि नकाशा मिळेल. थेट संपर्क: मिरवणूक, उत्सव किंवा कार्यक्रमासाठी पथक हवे असल्यास पथकाशी थेट संपर्क साधा. आमच्याकडून कोणतेही मध्यस्थ शुल्क आकारले जात नाही. पथकांसाठी नोंदणी: तुमचे पथक अजून यादीत नसेल, तर "Add your pathak" वर क्लिक करून माहिती भरा. आमची टीम माहितीची खात्री करून पथकाला यादीत समाविष्ट करेल. माहिती स्वतः अद्ययावत करा: पथक प्रमुखांना स्वतःच्या पथकाची माहिती, लोगो, फोटो आणि व्हिडिओ अद्ययावत करण्याची सुविधा आहे. पथकाच्या पानावरील "Update Info" वर क्लिक करून प्रवेशासाठी विनंती करा. पडताळणीनंतर तुम्हाला पासवर्ड पाठवला जाईल. विश्वासार्हता: प्रत्येक नोंद आणि प्रत्येक विनंती आमची टीम तपासते. त्यामुळे येथील माहिती अचूक आणि विश्वासार्ह राहते. आमचा उद्देश ढोल-ताशा परंपरेचा प्रसार करणे, नवीन पिढीला या कलेशी जोडणे आणि प्रत्येक पथकाला त्याची योग्य ओळख मिळवून देणे, हेच आमचे ध्येय आहे. लहान गावातील पथक असो वा मोठ्या शहरातील नावाजलेले पथक, प्रत्येकाला येथे समान स्थान आहे. चला, एकत्र येऊन ही गौरवशाली परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया.

Recently added pathaks

Dhol tasha pathaks by district